व्हिडीओ तुम्ही v.v.sonsandvvsons_ या इन्स्टाग्राम पेजवरून पाहू शकता. या व्हिडीओमध्ये एक ब्लॉगर नीता अंबानी यांनी घातलेल्या नेकलेसच्या काही डुब्लिकेट कॉपी दाखवत आहेत. या नेकलेसची किंमत केवळ १७८ ते २०० रुपये आहे. बरं, हे नेकलेस फक्त हिरव्याच नाही लाल, निळ्या आणि पांढऱ्या रंगामध्ये सुद्धा उपलब्ध आहेत. हा व्हिडीओ ११ लाखांपेक्षा अधिक नेटकऱ्यांनी पाहिला असून अनेकांनी त्यावर गंमतीशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. कोणी म्हणतेय, हा व्हिडीओ चुकूनही नीता अंबानी यांना दाखवू नका, तर कोणी म्हणतेय, अंबानींना यापूर्वी या दुकानाबद्दल माहिती नव्हती नाहितर त्यांनी एवढे पैसे खर्च केलेच नसते.
Viral video…नीता अंबानी यांचा ५०० कोटींचा नेकलेस मिळतोय १७८ रुपयांना
- Advertisement -