एका कारखान्यात चिक्की बनवली जात असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. शेंगदाणे आणि गुळाच्या मिश्रणाचे छोटे तुकडे केले जात आहे. मग हे तुकडे एका फ्रेममध्ये ठेवून जमिनीवरच सरकवले जात आहेत. यानंतर फरशीवरच चिक्कीला आकार देण्यात आला.
एवढेच नाही तर कर्मचाऱ्यांच्या हातात हातमोजे नाहीत, फरशीवर कोणतेही भांडी किंवा प्लास्टिक ठेवलेले नाही. त्यामुळे चिक्कीमध्ये तयार करताना सर्व काम थेट फरशीवर सुरु आहे. चिक्की बनवताना स्वच्छतेच्या अभावामुळे हा व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यावर लोकांकडून अनेक प्रतिक्रिया येत आहेत.