एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून बाप- लेकीची भन्नाट डान्स करणारी जोडी नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरली आहे. बाप- लेकीच्या या अनोखा डान्स स्टेप्सने नेटरकऱ्यांना वेड लावले आहे. अफलातून डान्स स्टेप्सवर थिरकणाऱ्या या जोडीने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहून त्यावर कमेंट करत आहेत. या व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे की, एक मुलगी आणि तिचे बाबा ‘गुलाबी शरारा’ या गाण्यावर रिल्स बनवत आहेत. या दोघांचे प्रेम आणि जिव्हाळा या त्यांच्या जुगलबंदीतून दिसून येत आहे. लक्षवेधी गोष्ट म्हणजे बाप- लेकीचा हा भन्नाट डान्स शूट करताना या मुलीची आई देखील त्यात दिसत आहे. अगदी कुतुहलाने ती या दोघांचा डान्स पाहताना दिसते.
- Advertisement -