आवड जोपासण्यास वयाचा आकडामध्ये येऊ नये असे म्हणतात. वयाच्या कोणत्याही टप्प्यात कोणतीही आवड पूर्ण करण्यास मनाची इच्छा मारू नये तसेच नवीन गोष्ट शिकण्यापासूनपाठी राहू नये. आधीच्या काळात पुरुष असो वा स्त्री संसाराच्या धावपळीत अनेकांना त्यांच्या मनात असलेल्या खुप गोष्टी करण्यास राहून गेल्या होत्या.
सोशल मीडियावरही आपल्याला अनेक आजी, आजोबांचे विविध व्हिडिओ व्हायरल झालेले पाहिले आहेत, त्यातून त्यांची आवड जोपासताना आपल्याला दिसतात. सध्या सोशल मीडियावर एका आजींचा व्हिडिओ धुमाकूळ घालत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला दिसते की, एक आजी आपल्या कुटुंबियासोबत समुद्रकिनारी फिरण्यास आली आहे. यात आजीने गुलाबी रंगाचे लुगड नेसलेले आहे. आजी समुद्रकिनारी फिरण्याच्या आनंद घेत आहेत, मात्र ती नवीन गोष्ट शिकण्यासाठीही उत्सुक दिसत आहे.तिच्या हातात आपल्याला कॅमेरा दिसत आहे. खास गोष्ट म्हणजे आजी तिच्या समोर असलेल्या व्यक्तीचा फोटो काढत आहे.