व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एक तरुण पाणी पुरी विक्रेता पाणी पुरीचा गाडा घेऊन रस्त्याने जात असतो. अचानक तो त्याचा स्पीकर बाहेर काढतो आणि त्यावर शाहरुख खान, सनी देओल आणि शक्ती कपूरच्या आवाजात डायलॉग बोलतो. त्याची मिमिक्री पाहून कोणीही अवाक् होईल. हा तरुण विक्रेता मिमिक्री द्वारे लोकांचे लक्ष वेधून घेतो जेणे करून लोक घराबाहेर पडून त्याच्याकडे पाणी पुरी खायला येईल. तरुणाचे हे टॅलेंट अनेकांना आवडेल. सध्या त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. https://www.instagram.com/reel/C7lwvIsysv4/?utm_source=ig_web_copy_link
पाणी पुरी विक्रीसाठी भन्नाट आयडिया..स्पीकरवर हुबेहुब शाहरुख, सलमानचा आवाज..व्हिडिओ
- Advertisement -