इन्स्टाग्राम @lil.singer.riya या अकाउंटने हा व्हिडीओ शेअर केला आहे. रिया केवळ साडेतीन वर्षांची असून तिला ३०० हून अधिक गाणी गाता येतात. अशी माहिती @lil.singer.riya या अकाउंटवरून समजते.कपाळावर नाजुकशी चंद्रकोर टिकली लावून अगदी मराठमोळ्या नटीसारखा पेहेराव केलेला आहे. “गं तुझं टपोरं डोलं, जसं कोळ्याचं जाळं” म्हणत भुवया उडवून आणि हातवारे करत तिने गाण्याची सुरुवात केली आहे. संपूर्ण गाणे तिने असेच नखरेल हावभाव देत, कधी मानेला झटका देऊन तर कधी डोळे मिचकावून अतिशय खट्याळ आणि गोंडस पद्धतीने गायलेले आहे.
- Advertisement -