Tuesday, June 25, 2024

एसटी वाचली पाहिजे आणि फेमस झाली पाहिजे… शाळकरी मुलीचा व्हिडिओ

या व्हिडीओमध्ये तुम्हाला एक शाळकरी चिमुकली दिसेल. ती बसस्थानकावर आली आहे. कारण काय तर तिला बसेस खूप आवडतात. त्यामुळे ही मुलगी बसेस बघायला बसस्थानकावर आली आहे या मुलीने शाळेचा गणवेश घातला आहे. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की बसस्थानकावर या शाळकरी मुलगी एकटी उभी असलेली पाहून एक काका विचारतात, “इथे अशी का उभी आहे?त्यावर ती तरुणी म्हणते, “बसेस बघायला आली आहे. मला बसेस खूप आवडतात. खूप दिवसाची इच्छा होती पण यायलाच मिळाले नाही पण आज काही करून बघू या असं ठरवलं. बसेस बघून खूप आनंद झाला असं वाटतं की दहावी पास झाली.”

एसटीवरील चिमुकलीचे प्रेम पाहून काका भारावून जातात आणि तिला म्हणतात, “असंच एसटीवर प्रेम कर आपली माय माऊली लाल परी एसटी वाचली पाहिजे.” त्यावर तरुणी म्हणते, “एसटी वाचली पाहिजे आणि फेमस झाली पाहिजे.”

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles