घटना उत्तर प्रदेशातील मेरठ या ठिकाणी घडली. लाल कुर्ती पेठ बाजारातील एका साडीच्या दुकानात एक भलामोठा अजगर शिरला होता. हा अजगर तब्बल १४ फूट लांब होता. तो दुकानात वरच्या बाजूस ठेवलेल्या साड्यांमध्ये लपला होता. मीडिया रिपोर्ट नुसार जेव्हा दुकानदार ग्राहकांना त्या साड्या दाखवण्याच्या इरात्यानं टेबलावर चढला तेव्हा अचानक तो अजगर त्याला दिसला. मग काय संपूर्ण दुकानात लोकं अक्षरश: भितीनं थरथरू लागले.
Video
त्यामुळे अर्थातच सर्पमित्रांना बोलावण्यात आलं. त्यांनी तब्बल सव्वा तास प्रयत्न केला तेव्हा कुठे या अजगराला पकडण्यात त्यांना यश आलं. सर्पमित्रांनी या अजगराला जंगलात सुरक्षित ठिकाणी सोडून दिलं.