व्हिडीओ उत्तर प्रदेशातील असल्याचा सांगितले जात आहे. समाजवादी पक्ष उत्तर प्रदेशातील सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे. सपाने राज्यात ३७ जागा जिंकल्या आहेत. त्याचवेळी सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला केवळ ३३ जागा जिंकता आल्या. अशा परिस्थिती राष्ट्रीय हिंदू परिषदेचे अध्यक्ष गोविंद पराशर हे भाजपला घोषणा दिल्याप्रमाणे ४०० जागा पार न करता आल्याने ते संतापले, यावेळी निकाल पाहत असतानाच त्यांनी भिंतीवर टीव्ही काढून फोडून टाकला, इतकेच नाही तर नंतर आग लावून पेटवून दिली. राष्ट्रीय हिंदू परिषदेच अध्यक्ष गोविंद पराशर निकाल पाहिल्यानंतर निराश होत टीव्ही सेट तोडताना दिसत आहेत. पराशर भिंतीवरून टीव्ही सेट काढून जमिनीवर फेकताना दिसत आहे, यावेळी इतर दोन लोक त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतात मात्र ते कोणाचेही न ऐकता टीव्ही धरुन थेट जमिनीवर आपटतात. यानंतर आग लावून पेटवून देतात. ही घटना उत्तर प्रदेशातील आग्रा येथे घडल्याचे सांगण्यात येत आहे.https://x.com/SachinGuptaUP/status/1797995352043475398