भारतीय संस्कृतीत हुंडा घेण्याची प्रथा अनेक वर्षांपासून सुरू आहे. ही हुंडा घेण्याची प्रथा बंद घेण्यासाठी अनेक कडक कायदे अस्तिवात आहेत. मात्र तरीही ही प्रथा सर्रास सुरू आहे. अशिक्षितांसह सुशिक्षित लोकही या प्रथेचे प्रचार करताना दिसतात. सध्या असाच एक व्हिडिओ माध्यमांवर जोरदार व्हायरल होत आहे.अलिकडच्या काळात लग्नसोहळा धुमधडाक्यात करण्याची प्रचंड क्रेझ पाहायला मिळत आहे. लग्न सोहळ्यात अनेक महागड्या भेटवस्तू दिल्याच्या बातम्याही समोर येत असतात. मात्र नोएडामध्ये एका लग्न सोहळ्यात नवरदेवाला दिलेल्या वस्तूंची यादी ऐकून नेटकरीही हैराण झालेत. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होत आहे.
Video: नवरदेवाला लग्नात मिळाली मर्सिडीज, १ कोटी रुपये अन् १. २५ किलो सोनं
- Advertisement -