सोशल मीडियावर एकापेक्षा एक भन्नाट अन् तितकेच चक्रावून टाकणारे व्हिडिओ पाहायला मिळतात. सध्या एका लग्नातील व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ चर्चेत येण्याचे कारण म्हणजे तरुणाने एकाच मंडपात चक्क चार तरुणींशी विवाह केलायं. हा सगळा प्रकार पाहून नेटकरीही चांगलेच हैराण झालेत.
सोशल मीडियावर लग्नातील अनेक व्हिडिओ व्हायरल असतात. कधी नवरा- नवरीच्या जबरदस्त एन्ट्रीची, कधी डान्सची, तर कधी पाहुण्यांमध्ये जुंपलेल्या भांडणांची माध्यमांवर चर्चा पाहायला मिळते. मात्र सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओने नेटकरीही हादरुन गेलेत. कारण व्हिडिओमध्ये एक तरुण चक्क चार मुलींशी लग्नगाठ बांधताना दिसत आहे.
लग्न म्हणजे दोन जिवांची भेट. दोन जिवांची आयुष्यभरासाठी बांधली जाणारी गाठ म्हणजे लग्न. मात्र या व्हायरल व्हिडिओमध्ये एकाचवेळी, एकाच मांडवात चक्क चार मुलींसोबत विवाह गाठ बांधली आहे. व्हिडिओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनीही त्यावर जोरदार प्रतिक्रिया दिल्यात.
सारथी मेरे रथ को खाई के तरफ ले चलो…🤐 pic.twitter.com/n9bYlCOtMS
— मुसाफिर 🚶vk (@musafir_vj) December 7, 2023