Wednesday, April 30, 2025

video :विराट कोहलीशी लग्न करण्याचं कारण…. अनुष्का शर्माने भर कार्यक्रमात सांगितल

भारतीय फलंदाज विराट कोहली आणि बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांची जोडी जगभरात लोकप्रिय आहे. २०१३ मध्ये एका नामांकित कंपनीच्या जाहिरातीनिमित्त दोघांची पहिली भेट झाली होती. यानंतर अनेकवर्ष एकमेकांना डेट केल्यावर विराट-अनुष्काने ११ डिसेंबर २०१७ मध्ये इटलीत थाटामाटात लग्न केलं. आज त्यांच्या लग्नाला ६ वर्षे पूर्ण झाली आहेत. दोघांचे चाहते त्यांना ‘विरुष्का’ असंही संबोधतात. काही महिन्यांपूर्वी विराट-अनुष्काने जोडीने ‘प्युमा’च्या एका मुलाखतीला हजेरी लावली होती. यावेळी अभिनेत्रीने तिने विराटशी लग्न करण्याचा निर्णय का घेतला याचं मजेशीर कारण सांगितलं होतं.

विराट-अनुष्काला या मुलाखतीत त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत अनेक प्रश्न विचारण्यात आले होते. यावेळी अभिनेत्रीने भर कार्यक्रमात विराटची स्मरणशक्ती अतिशय चांगली असून आम्ही डेट करत असताना त्याच्या सगळ्या गोष्टी लक्षात राहायच्या ते सांगितलं होतं. अनुष्का म्हणाली होती, “जेव्हा आम्ही एकमेकांना डेट करायचो तेव्हा विराट काहीच विसरायचा नाही. एकीकडे मी खूपच विसरभोळी आहे पण, दुसरीकडे त्याला अनेक वर्षांपूर्वीच्या गोष्टी सुद्धा अचूक लक्षात असतात. त्याची स्मरणशक्ती पाहून मी खरंच प्रभावित झाले होते. तेव्हाच ठरवलं ‘यार, ये तो लाइफ पार्टनर ही अच्छा है’ (तो एक उत्तम जोडीदार आहे.) त्याचे हे सगळे गुण मला प्रचंड आवडायचे शेवटी त्यानंतर आमचं लग्न झालं.”“मी माझा फोन विसरते, घरातील गोष्टींबद्दल मला काहीच माहित नसतं. पण, मी माझ्या मुलीबद्दल एकही गोष्ट विसरत नाही. माझी स्मरणशक्ती फक्त माझ्या मुलीसाठी चांगलीये… बाकी सगळ्या गोष्टी विराटला माहिती असतात. खरंतर वृश्चिक राशीची माणसं कधीच काही विसरत नाहीत. याला आता ३ हजार वर्षांपूर्वीच्या गोष्टी सुद्धा आठवतील.” असं अनुष्काने सांगितलं. तिचा खुलासा ऐकून उपस्थित सगळेजण हसू लागले होते.
विराट-अनुष्काला या मुलाखतीदरम्यान विविध टास्क देण्यात आले होते. यावेळी अनुष्का शर्माला तिच्या कोणत्याही चित्रपटातील फेमस डायलॉग अर्धा बोलून, पुढचा डायलॉग विराट कोहलीच्या लक्षात आहे का? हे पाहण्यास सांगितलं होतं. यावर अनुष्काने तिच्या ‘बँड बाजा बारात’ चित्रपटातील- “प्यार व्यापार की जोडी कभी नही बैठती, ना भाई मै तो सिंगल ही बेस्ट हूं,” हा डायलॉग म्हणून दाखवला आणि पुढचा डायलॉग विराटला पूर्ण करण्यास सांगितलं.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles