दक्षिण आफ्रिकेच्या डावात डीजेने विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्माच्या चित्रपटातील गाणे वाजवले. बँड बाजा बारात या चित्रपटातील ‘ऐंवी ऐंवी लुट गया’ हे गाणे वाजताच विराट स्वतःला नाचण्यापासून रोखू शकला नाही. या गाण्याची हुक स्टेप विराटने मैदानात करून दाखवली, चाहत्यांचा त्याला प्रतिसादही कमालीचा होता. यासोबतच विराटने शाहरुख खानच्या जवान या चित्रपटातील ‘चलिये’ या गाण्यावरही आपल्या स्टेप्स दाखवल्या. यादरम्यान विराट हात पसरून शाहरुखची सिग्नेचर स्टेप करताना दिसला. या दोन्हीचे व्हिडिओ खुद्द आयसीसीने सोशल मीडियावर शेर केले आहेत.
सचिनच्या विक्रमाला गवसणी घातल्यानंतर विराटचा मैदानात हटके डान्स…व्हिडिओ
- Advertisement -