नाशिक : विधान परिषदेच्या नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या जागेसाठी बुधवारी (दि. 26) मतदान पार पडले. सायंकाळी सहा वाजेपर्यंत अंदाजे 93.48 टक्के मतदान झाले. नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी 21 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले असून, 1 जुलै रोजी निकाल जाहीर होणार आहे. मात्र निकालाआधीच अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांचे विजयाचे बॅनर झळकल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
निकालाआधीच कोपरगावमध्ये विवेक कोल्हे यांचे विजयाचे बॅनर झळकले आहे. विवेक कोल्हे यांच्या समर्थकाने अभिनंदनाचे फलक लावले असून मी विवेक स्नेहलता बिपिन दादा कोल्हे ईश्वर साक्षी शपथ घेतो की, असा उल्लेख बॅनरवर करण्यात आला आहे. या बॅनरची सध्या नाशिक शिक्षक मतदारसंघात जोरदार चर्चा होत आहे. आता एक जुलैच्या निकालाकडे सर्वांचे लागले लक्ष आहे.