जिल्ह्यातील अहमदनगर दक्षिण व शिर्डी लोकसभामतदारसंघांमध्ये मतदान केंद्रावर सकाळपासूनच मतदारांच्या रांगा लागल्या आहेत. सकाळी नऊ वाजेपर्यंत झालेल्या मतदानाची आकडेवारी पाहिली असता नगर दक्षिणेत 5.13% तर शिर्डीमध्ये 6.83% मतदान झाले आहे.
राज्याचे लक्ष लागून असलेल्या नगर जिल्ह्यामध्ये यंदा चुरशीचा सामना पाहायला मिळणार आहे. मतदारांना जास्तीत जास्त जागृत करत मतदान केंद्रावर पोहोचवण्याचे काम प्रशासनाकडून सुरू आहे. सकाळी नऊ वाजेपर्यंत आलेल्या आकडेवारीनुसार, नगर दक्षिणेत दहा लाख 32 हजार 946 पुरुष मतदार व नऊ लाख 48 हजार 801 महिला मतदार असे एकूण 19 लाख 81 हजार 866 मतदार आहेत.