७० व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा नवी दिल्ली येथे करण्यात आली असून ‘वाळवी’ या चित्रपटाला मराठी भाषेतील सर्वोत्तम चित्रपटाच्या पुरस्कार जाहीर झाला आहे. फिचर फिल्म श्रेणीत ३८ पुरस्कार तर, नॉन फिचर फिल्ममध्ये विविध श्रेणीमध्ये १८ पुरस्कार जाहीर झाले आहेत. महाराष्ट्राला ५ पुरस्कार जाहीर झाले आहेत.
सर्वोत्तम माहितीपटाचा पुरस्कार -‘मर्मर्स ऑफ द जंगल’, सर्वोत्तम जीवनचरित्रात्मक ऐतिहासिक पुनर्निर्माण संकलन चित्रपटाचा पुरस्कार -‘आणखी एक मोहेंजो दारो’, सर्वोत्तम कला-संस्कृती चित्रपट – ‘वारसा’ (लेगसी)’ तर, सर्वोत्तम निवेदन आणि आवाजासाठी सुमंत शिंदे यांना पुरस्कार जाहीर झाले आहेत.