सावधान! गडकिल्ल्यांवर मद्यपान केल्यास थेट तुरुंगवास आणि आर्थिक दंड!
छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांच्या शौर्याचे, साहसाचे जिवंत प्रतीक म्हणजे आपले गडकिल्ले. या गडकिल्ल्यांच्या संरक्षणासाठी महायुती सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात सादर करण्यात आलेल्या विशेष विधेयकानुसार, आता महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांवर मद्यपान किंवा कोणताही प्रकारचा अनिष्ट गैर प्रकार केल्यास एक लाख रुपयांचा दंड आणि थेट तुरुंगवासाची शिक्षा होईल. या विधेयकाला अधिवेशनात मंजुरी देण्यात आली आहे.






