Thursday, July 25, 2024

दिलासादायक बातमी… पुढचे चार दिवस महत्वाचे, राज्यात मुसळधार पावसाचा इशारा

राज्यात मान्सून दाखल होऊन बरेच दिवस झाले पण अजून म्हणावा तसा पाऊस राज्यात पडला नाही. सध्या काही जिल्ह्यात मुसळधार पाऊस (पडत आहे. तर काही ठिकाणी रिमझिम आणि हलका पाऊस पडत आहे. पण आता पाऊस चांगला जोर धरणार असून मुंबईसह राज्यभरात मान्सून सक्रिय होत आहे. अशामध्ये पुढचे चार दिवस कोकणसाह राज्यातील इतर भागांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांसाठी ही दिलासादायक बातमी आहे.

हवामान खात्याकडून दिलेल्या माहितीनुसार, ‘मुंबईसह राज्यभरात मान्सून सक्रिय होत असून पुढील चार दिवस दक्षिण कोकणासह राज्यात पावसाचा जोर वाढेल.’ राज्यातील काही जिल्ह्यांना हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा जारी केला असून यामध्ये कोकणातील जिल्ह्यांचा समावेश आहे. मुंबई, ठाणे, भिवंडी, नवी मुंबईसह लगतच्या भागात पावसाने रिमझिम का होईना हजेरी लावली. मुंबईच्या तुलनेत मुंबई उपनगरामध्ये पावसाचा जोर अधिक होता.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles