Sunday, July 14, 2024

लाच प्रकरणी सरपंच पती, उपसरपंच, ग्रामसेवक ‘एसीबी’च्या जाळ्यात…

गावातील एक कर प्रकरण मिटवतो असं म्हणत 30 हजारांची लाच मागितल्या प्रकरणी वाशिमच्या मानोरा तालुक्यातील आमगव्हान गावातील संरपंचांचा पती, सासरा, उपसरपंच आणि ग्रामसेवकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात सरपंचांच्या सासऱ्याला रंगेहात पकडण्यात आलं आहे.

वाशिमच्या मानोरा तालुक्यातील आंमगव्हान गावातील एका जुन्या प्रकरणाची कर वसूली करून ग्रामपंचायतला रक्कम जमा न करता परस्पर वसुली केल्याबाबतचे प्रकरण चौकशी मागे घेणे आणि नमुना नंबर 10 पावती पुस्तकाबाबतचे प्रकरण मिटवून देण्यासाठी तक्रारदाराला 50 हजाराची लाच मागितली. यापैकी 30 हजारांची रक्कम स्वीकारताना वाशिमच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवारी दुपारी सरपंचांच्या सासऱ्यांना रंगेहात पकडले.

याप्रकरणी ग्रामसेवक राजेश विठ्ठलराव ठाकरे ,सरपंचांचे सासरे देविदास ऊर्फ दयाराम चरणदास मेहळा (मेहल्डे), सरपंच पती सतिश देविदास मेहळा आणि उपसरपंच देवेंद्र भिमराव कानोडे अशा चौघांवर मानोरा पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles