या व्हायरल व्हिडीओमध्ये दिसतेय की, एका प्लास्टिकच्या बाटलीने झाडांना पाणी दिले जात आहे. विशेष म्हणजे ही पाण्याने भरलेली बाटली कोणी हातात धरलेली नसून ही खास पद्धतीने झाडांच्या वरती लटकवलेली आहे. या बाटलीला चार छिद्रे पाडली असून या छिद्रांच्या मदतीने एका बाटलीतून एकाच वेळी चार झाडांना पाणी दिले जात आहे.
हा भन्नाट जुगाड पाहून तुम्हीही थक्क व्हाल. या ट्रिकमुळे घरी कोणी नसतानासुद्धा तुम्ही झाडांना पाणी घालू शकता आणि झाडांना पाणी घालण्यासाठी तुम्हाला कुणाला सांगायची गरज पडणार नाही. फक्त घरातून बाहेर पडण्यापूर्वी तुम्हाला ही बाटली पाण्याने भरून ठेवावी लागेल.
सुटीत गावाला गेल्यावर घरी झाडांना पाणी कोण घालणार ? हा खास उपाय करा…व्हिडिओ
- Advertisement -