बाजारात एक वेगळ्या फ्लेव्हरचे पॉपकॉर्न आले आहेत. या प्रकाराला ‘वाटरमेलन पॉपकॉर्न’ असं म्हणतात. कारण हे पॉपकॉर्न चक्क कलिंगडापासून तयार केले जातात.
सर्वात आधी कलिंगडाचा एक तुकडा गरम भांड्यात टाकून तो छान गरम करून घेतला. मग त्यावर मक्याचे दाणे, थोडं तेल आणि मिठ टाकलं. मग हे मिश्रण छान एकजीव करून घेतलं. कलिंगड पूर्णपणे वितळून जेव्हा भांड्यात लाल रंगाचं पाणी तुम्हाला दिसेल तेव्हा भांड्यावर झाकण ठेवा. अन् बस थोड्या वेळातच कलिंगडाचे पॉपकॉर्न तयार. हा व्हिडीओ funfood1.o या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे.