Saturday, September 14, 2024

राज्यात आजपासून पुन्हा पाऊस, ‘या’ जिल्ह्यांत हवामान खात्याचा अलर्ट

जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच महाराष्ट्रात मुसळधार पाऊस झाला. अनेक जिल्ह्यांना पावसाने चांगलंच झोडपून काढलं. पण ऑगस्ट महिना सुरु होताच राज्यात पावसाने उसंत घेतली. सध्या काही ठिकाणी पावसाच्या तुरळक सरी कोसळत आहेत. त्यामुळे बळीराजाने शेतीकामांना वेग दिलाय. अशातच राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

आज शुक्रवारपासून राज्यातील काही भागात पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी कोसळण्याची शक्यता आहे. आयएमडीच्या अंदाजानुसार, आजपासून पुढील चार ते पाच दिवस विदर्भ आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव आणि परभणी जिल्ह्याला पावसाचा इशारा देण्यात आलाय. विदर्भातील अमरावती, अकोला, बुलढाणा, परतवाडा, अकोट, अचलपूर, वर्धा, नागपूर शहरात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मुंबईसह उपनगर आणि कोकणालाही पावसाचा इशारा (Heavy Rain) देण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे. दुसरीकडे अहमदनगर, नाशिक नंदुरबार, धुळे, जळगाव जिल्ह्यातही रिमझिम पावसाची शक्यता आहे.त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीकामांना वेग द्यावा तसेच सर्व प्रलंबित कामे आटोपून घ्यावीत, असा सल्ला देण्यात आलाय. दरवर्षीच्या तुलनेत यंदा मान्सून लवकरच महाराष्ट्रात दाखल झाला होता. मात्र, जून महिन्यात समाधानकारक पाऊस झाला नाही. परिणामी खरीप हंगामातील पेरण्या खोळंबल्या.

मात्र, जुलै महिना सुरु होताच मान्सूनने जोर पकडला. अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस झाल्याने धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा जमा झाला. आता ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या दोन आठवड्यात पावसाने पुन्हा उसंत घेतली. परंतु अचानक गायब झालेला पाऊस पुन्हा परतण्याची शक्यता आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles