Saturday, January 18, 2025

Video: लग्न मंडप की आखाडा…जेवणासाठी वऱ्हाड्यांमध्ये सिनेस्टाईल हाणामारी

एका लग्नातून एक विचित्र घटना समोर आली आहे.चक्क लग्नाच्यावेळी वऱ्हाडी मंडळीमध्ये चक्क जेवणावरून तूफान हाणामारी सुरु आहे.सध्या लग्नातील या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्हा पाहू शकता की, व्हिडिओ हा एका लग्नसोहळ्यातील हॉलमधील आहेत. व्हिडिओच्या सुरुवातीस आपल्याला त्या हॉलमधील खुर्च्या विखुरलेल्या दिसत आहेत.यात काही व्यक्ती खुर्च्या उचलून एकमेंकाना चक्क फेकून मारत आहेत. यात काहीच्या डोक्याला खुर्च्यांचा मार लागत आहे, तरी तेही थांबण्याचे नाव घेत नाही.सुरु असलेल्या हाणामारीला काही महिला अडवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत तरी देखील पुरुषाची हाणामारी काही थांबत नाही.लग्नातील व्हायरल व्हिडिओ सोशल मीडिया एक्सवरील @priyarajputliveया एक्स अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला आहे

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles