Tuesday, April 29, 2025

Video: करवलीचा डाव फसला; भर मांडवात नवरदेवासमोर जोरदार खाली आपटली

लग्न म्हटलं की त्यामध्ये मौज मजा आणि मस्ती आलीच. लग्नातील विविध रीतिरिवाज आपल्या भारतात पार पडतात. विविध जातींनुसार लोकांच्या रीतिभाती वेगळ्या असतात. लग्नात नवरीपेक्षा करवलीची जास्तच चर्चा असते. अशात सोशल मीडियावर नुकताच एका करवलीचा भन्नाट व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
लग्नात नवरदेवाचे बूट लपवण्याची परंपरा आहे. बूट लपवून त्या बदल्यात त्याच्याकडून पैसे मागितले जातात. म्हणजेच ओवाळणी मागितली जाते. यावेळी नवरदेव आणि नवरी दोन्ही गटांमध्ये थोडे रुसवे फुगवे आणि मोठी टक्करही पाहायला मिळते. सागर संगीत होऊन सर्व लग्न पार पडतात.अशात सध्या सोशल मीडियावर एक भन्नाट व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये कलवरीने भलतीच करामत केलीये आणि स्वतःचं हसं करून घेतलं आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, लग्नाची लगबग सुरू आहे. मंडपात नवरदेव आणि नवरी दोघेही उभे आहेत.
पाहुणे, नातेवाईक आणि भडजी बुवांनी मांडव साजलाय. असे असताना सुरू आलेल्या विधीत सर्व गुंतले आहेत. तितक्यात नवरदेवाला नवरीच्या डोक्यावर फुले टाकण्यास सांगतात आणि तो आपल्या जागेवर उभा राहतो आणि नवरीच्या डोक्यावर फुले टाकतो. फुले टाकण्यासाठी तो जसा पुढे सरकतो तशी मागून एक कलवरी त्याच्यावर झेप घेते.

या कलवरीच्या हातात एक फुलांचा हार म्हणजेच वरमाळा आहेत. नवरदेवासोबत तिला लग्न करायचे असणार त्यामुळे तिने मौके पे चौका मारायचा असं ठरवलं असणार. मात्र यात नवरदेवाला तिचा डाव समजतो आणि तो मागे सरकतो. त्यामुळे ही कलवरी धाडकन खाली आदळते.


@mohan_khursenga06 या इंस्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles