लग्न म्हणजे दोन जिवांचा संगम. आयुष्यातील हा खास क्षण अविस्मरणीय व्हावा, असे प्रत्येक तरुण- तरुणीला वाटते. ज्यासाठी प्रत्येकजण हटके स्टाईल शोधत असतो. अलिकडच्या काळात लग्नात फोटोशूटची प्रचंड क्रेझ निर्माण झाली आहे. एकापेक्षा एक हटके पोझ देत लग्नात नवरा- नवरी फोटोशूट करत असतात.
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये लग्नातील फोटोशूटवेळी नवरा- नवरीची चांगलीच फजिती झाल्याचे दिसत आहे. काय आहे या व्हायरल व्हिडिओची कथा, जाणून घ्या सविस्तर.
लग्न सोहळ्यात घडणाऱ्या अनेक गमती- जमतींचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. कधी नवरदेवाची हटके एन्ट्री, कधी नवरीचा भन्नाट डान्स तर कधी मित्रमंडळीच्या करामती नेटकऱ्यांचे लक्ष वेधत असतात. सध्या एका लग्न सोहळ्यातील असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हिडिओमध्ये लग्नात फोटोशूट करत नवरा- नवरी पोझ देत आहेत. अचानक नवरदेवाचा तोल जातो अन् दोघेही जोरात आदळतात. भर मंडपात झालेल्या या फजितीचा व्हिडिओ व्हायरल झाला