लग्न समारंभात अशा काही घटना घडतात ज्या पाहून आपल्याला हसू येतं. लग्न म्हटलं की मोठी धामधूम असते. वधू-वर पासून दोन्ही पक्षाकडील सर्व नातेवाईक आपआपल्या कामात गुंतलेला असतो. समारंभाच्या गोंधळात इतके बुडाले असतात त्याचवेळी अशा काही गोष्टी घडतात, ज्या पाहून आपल्याला हसू येत असतं. असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
ब्राह्मण देवाची सुचना मिळताच नवरदेव वेगळीच कृती करतो, ते पाहून नवरीसह सर्वजण हसू लागतात. ऐन मंगळसूत्र बांधताना काहीतरी चुकीचं झालं असं नवरदेवाला कळतं, तेव्हा नवरदेव लाजतो. त्याच कृत्यावर त्याला हसू येत ते पाहून मंडपातील सर्वजण त्याच्यावर हसू लागतात. यातून नवरदेव किती आज्ञाधारक आहे, याची जाणीव आपल्याला होते. हा व्हिडिओ neopix photography नावाच्या इस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आलाय.
या व्हिडिओमध्ये नवरदेव आणि वधूने एकमेकांना वरमाला घातल्यानंतर शेजारी बसतात. तेव्हा ब्राह्मण देवा त्यांना मंगळसूत्र बांधण्याचा विधी सांगतात. देवा मंत्रोपच्चार म्हणत असतात. त्यावेळी ते नवरदेवाला सांगतात वधूला मंगळसूत्र बांधा. त्यावेळी मंत्र बोलताना ब्राह्मण बुवा म्हणतात वरमाला मागे घ्या. पण वर कदाचित आज्ञाधारक स्वभावाचा असावा. त्याने ब्राह्मण बुवाने सुचना देताच नवरदेवाने आपल्या गळ्यातील वरमाला मागे केली. परंतु ब्राह्मण देवा नवरदेवाला वधूची वरमाला मागे करण्याची सूचना देतात.
Video: आज्ञाधारक नवरदेव! मंगळसूत्र बांधताना वरानं केलं वेगळंच कृत्य; भरमंडपात…
- Advertisement -