व्हायरल व्हिडीओ एका लग्नातील आहे. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की आजुबाजूला नातेवाईक आणि मित्रमंडळ उभे आहेत आणि नवरदेवाची बहिण तुफान डान्स करताना दिसत आहे. ती काळ्या साडीत खूप सुंदर दिसत आहे. ‘शरारा शरारा’ या गाण्यावर तिने सुंदर स्टेप्स केल्या आहेत. आजुबाजूला उभे असलेली लोकं तिचा डान्स बघून टाळ्या वाजवताना दिसत आहे. विशेष म्हणजे हा डान्स ती पेन्सिल हिल्स घालून करताना दिसत आहे.
- Advertisement -