सध्या सगळीकडे लग्न कार्याची धुमधाम सुरु आहे. प्रत्येकाच्या आयुष्यातील लग्न हा अविस्मरणीय क्षण असतो. त्यात लग्नातील प्रत्येक क्षण खास करण्यासाठी कुटुंबियापासून सर्वांची तारेवरची कसरत सुरु असते. प्रत्येक गोष्टीवर अफाट पैसा खर्च करत असतात. पण त्यातील एक महत्वाची गोष्ट म्हटलं म्हणजे लग्नपत्रिका.
आपल लग्नातील लग्न पत्रिका सर्वांच्या लक्षात राहण्यासाठी काहीजण फक्त पत्रिकेवर भरपूर पैसा खर्च करतात. लग्नाच्या खरेदीची पहिली सुरूवात ही पत्रिका निवडण्यापासून होते. अशातच सध्या सोशल मीडियावर एका आगळ्यावेगळ्या लग्नपत्रिकेचीच चर्चा सुरु आहे. तुम्ही म्हणाल नक्की काय वेगळे आहे..?तर लग्नासाठी छापली जाणारी लग्नपत्रिका चक्क एका एटीएम कार्ड वर छापली आहे. हे बघून तुम्ही ही म्हणाल लग्नपत्रिका आहे की एटीएम कार्ड..






