सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यात लग्नाचे किंवा नवरा नवरीचे व्हिडीओ जास्त प्रमाणात असतात. कधी संगीत, लग्न तर कधी हळद समारंभाचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. अनेकजण लग्नात काहीतरी वेगळं करण्याच्या प्रयत्न करतात. कधी नवरी-नवरा एन्ट्रीला डान्स करतात तर कधी एकमेकासाठी गाणं म्हणतात. लग्नात खूप जास्त पैसा खर्च करतात. परंतु कधी तुम्ही नवऱ्याने गळ्यात वरमालाऐवजी पैशांची माळ घातलेली पाहिलंय का? असाच एका व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका वराने चक्क २० लाखांची वरमाला घातली आहे
लग्नात वर अगदी चांगला दिसावा यासाठी मेहंदी आणि मेकअपपासून बराच खटाटोप केला जातो. नवरीच्या घरचे लोक नवऱ्याचा खूप जास्त मानपान करतात. अशात आपण किती वरचढ आहोत तसेच लग्नात सर्वांनी आपल्यालाच पहावे यासाठी एका वराने चक्क २० लाखांची वरमाला घातली आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
लग्नात एक नवरदेवाने चक्क २० लाख रुपयांच्या नोटा चिटकवलेली माळ घातली आहे. या माळेचं वैशिष्ट म्हणजे या माळेची उंची तीन मजली इमारती एवढी आहे. व्हिडीओत नवरदेव घराच्या छतावर उभा आहे. ती माळ त्याने गळ्यात घातलेली दिसत आहे. अगदी खालच्या मजल्यापर्यंत ही माळ पसरलेली दिसतेय. या माळेत ५०० रुपयांच्या नोटा लावण्यात आल्या आहेत.
Video: नवरदेवाचा अनोखा स्वॅग! गळ्यात घातला २० लाख नोटांचा हार…
- Advertisement -