सध्या सर्व ठिकाणी लग्नसमारंभाचा हंगाम असल्याचे आपल्याला दिसत आहे. अनेक लग्नातील धमाल मज्जा मस्तीचे रील सोशल मीडियावर खूप व्हायरल होऊ लागले आहेत. कधी नवरी मुलगी डान्स करत स्टेजवर येते तर कधी नवरा मुलगा डान्स करत नवरीला स्टेजवर आणतो. असे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आज असाच एका लग्न सोहळ्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात नवर देवाच्या वागणुकीवर नेटकरी संताप व्यक्त केला आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडिओत आपल्याला दिसते की, नवरदेव आणि नवरीमुलगी स्टेजवर उभे आहेत. नवरदेवाच्या हातात फुलांची माळ आहे. त्यांच्या आजूबाजूला स्टेजवर अनेक वऱ्हाडी मंडळी आहेत. अशातच नवरदेव नवरीच्या कानात काही तरी सांगत असतो, त्यावर नवरी नाही बोलते. तिने नाही बोल्यावर तो नवरीच्या गळ्यात हार घालत नाही.अशात नवरदेव पटकन असे काही करते ज्यामुळे नववधू लाजू लागते. वर वधूच्या जवळ जातो आणि तो तिच्या गालावर चुंबन घेतो. हे पाहून मंडपातील सर्व लोकांना हसू येतं.
व्हायरल व्हिडिओ @ChapraZila या एक्स सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आला आहे. नक्की हा व्हिडिओ कुठला आहे हे समजू शकले नाही
जबतक दूल्हे का डिमांड पूरा नही हुआ तबतक दूल्हे ने दुल्हन को वरमाला नही पहनाया 😂😅 pic.twitter.com/tfJVk447zA
— छपरा जिला 🇮🇳 (@ChapraZila) December 18, 2023