Tuesday, February 27, 2024

video: भरलग्नमंडपात नवरीमागे कुत्रा लागला, पाहुण्यांची पळापळ

सोशल एका लग्नसमारंभातील व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओपाहून सर्वचजण चकित झालेत. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, लग्नमंडपात नवरीच्या मागे एक कुत्रा लागला आहे. नवरी पुढे पळतेय आणि कुत्रा तिच्या मागे मागे पळत आहे. नवरीने घागरा घातला असल्याने तिला व्यवस्थित पळता देखील येत नाही. मंडपात पुजेचं सामान ठेवलेलं आहे. त्यातुनच हे दोघे पळत आहेत.
अशात पुजेसाठी ठेवलाल कलश आणि कुरमुऱ्यांचे ताट खाली पडते. मंडपात सगळीकडे हे कुरमुरे आणि तांदुळ पसरले जातात. नवरीला कुत्र्यापासून दूर करण्यासाठी सर्वजण धावपळ करतात. मात्र कुत्रा काही ऐकायला तयार नाही. शेवटी नवरदेव पुढे येतो आणि आपल्या पत्नीला कुत्र्यापासून वाचवतो. त्यानंतर कुत्रा तेथून निघून जातो.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles