नवरा बायकोचं नातं फार अनमोल नात्यांपैकी एक असतं. लग्न सर्वांच्या आयुष्यातला खास क्षण असतो त्यात आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत लग्न जर झाले त्या पेक्षा दुसरा आनंद नसतो. मात्र हे लग्न जर मनाविरुध्द होत असेल तर खूप नुकसान होऊ शकतं.
लग्न जुळवताना नवरा नवरीची नेहमीच परवानगी घ्यायला हवी. त्यांचा होकार आल्यास लग्न करावे. परंतु मनाविरुध्द लग्न केल्यावर काय होते. याचाच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय लग्नात नववधू नवरदेव एकमेंकाना सात जन्म साथ देण्याचे वचन करतात. मात्र, एका लग्नात नवरीने नवदेवाला हाणले आहे. याच आगळ्यावेगळ्या लग्नाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.व्हायरल व्हिडिओत लग्नाचा मंडप आपल्याला दिसत आहे. लग्नाच्या मंडपात नवरा नवरीने पोशाख परिधान केलेला आहे. यात सुरुवातीस नवरी नवरदेवाला जबरदस्ती मिठाई भरवत असल्याचे आपल्याला दिसत आहे,
त्यानंतर नवरीला मिठाई खायची नसल्यानेही तो तिला जबरदस्ती मिठाई भरवतो.यामुळे नवरीला त्या नवरदेवाचा प्रचंड राग येतो. ती कसलाही विचार न करता सगळ्यांसमोर नवरदेवाला मारते. नवरीचाहा अवतार पाहून नेटकरी हैराण झाले.लग्नात नवरदेवाची होणारी धुलाई पाहून नेटकरी हा व्हिडिओ आपल्या मित्र मंडळीत व्हायरल करत आहेत.