नव्याने सुरु झालेल्या शेतकरी समृद्ध विशेष रेल्वे सेवेचे स्वागत
देशभरात रेल्वे सेवा घेऊन जाण्याची पीपल्स हेल्पलाइन व भारतीय जनसंसदेची मागणी
नगर (प्रतिनिधी)- शेतीमालाला देशभरातून चांगला भाव मिळण्याच्या उद्देशाने केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी महाराष्ट्रातील देवळाली ते बिहारमधील दानापुर पर्यंत धावणाऱ्या शेतकरी समृद्ध विशेष रेल्वे सुरु केल्याचा पीपल्स हेल्पलाइन व भारतीय जनसंसदेच्या वतीने स्वागत करण्यात आले आहे. नुकेतच संघटनेच्या वतीने शेतकऱ्यांसाठी वंदे किसान गुड्स ट्रेन्स सुरु करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालया समोर आंदोलन करण्यात आले होते. नुकतेचे सुरु झालेल्या या रेल्वेमुळे सर्व शेतकरी वर्गाच्या आशा पल्लवीत झाल्या असून, ही रेल्वे सेवा भारतातील सर्व राज्यात नेण्याचा आग्रह संघटनांच्या वतीने धरण्यात आला आहे.
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सुरु केलेल्या शेतकरी समृद्ध विशेष रेल्वेमुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आनंद झाला आहे. संघटनेच्या वतीने केलेल्या आंदोलनाला काही प्रमाणात यश आले आहे. देशभरात शेतकरी संरक्षण कायदा आणावा आणि त्यातून केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या माल देशातील विविध बाजारपेठांकडे वाहून नेण्यासाठी रेल्वे वाहतुकीची व्यवस्था करण्याची संघटनांची प्रमुख मागणी आहे. यासाठी संघटना देशव्यापी व्यापक आंदोलन करणार आहे. देशभरात रेल्वे गाड्या थांबविण्यासाठी सुद्धा संघटना प्रयत्नशील आहेत. देशात शेतकरी संरक्षण कायदा आणण्यासाठी संघटना देशभरातील शेतकरी संघटनांबरोबर संपर्कात असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
शेतकरी संरक्षण कायद्यासाठी अनिल धनवट, ॲड. कारभारी गवळी, सीमा नरवडे, भीमराज गाजेर, मिलिंद नागवडे, सुनील टाक, अंबादास चव्हाण, साहेबराव सोमवंशी, सुनील सकट, पांडुरंग पडवळ, शरद गद्रे, पंकज कुलकर्णी, विक्रम शेळके, प्रवीण उगले, विजय शिरसाठ, पांडुरंग पडवळ आदी प्रयत्नशील आहेत.
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आष्टी-नगर-पुणे डेमु वंदे मराठवाडा एक्सप्रेस रेल्वे गाडी नक्की चालू करतील अशी अपेक्षा ॲड. कारभारी गवळी यांनी व्यक्त केली. ही रेल्वे सेवा सुरु होण्यासाठी शनिवारी (दि.19 ऑक्टोबर) नगरच्या रेल्वे स्टेशनवर सकाळी 10 वाजता सूर्यनामा आंदोलन करणार आहेत. आंदोलन तीव्र करून रेल्वे मंत्र्यांचा प्रतिसाद मिळवण्यात या संघटनेचा प्रयत्न असल्याचे सांगण्यात आले आहे.
नव्याने सुरु झालेल्या शेतकरी समृद्ध विशेष रेल्वे सेवेचे स्वागत
- Advertisement -