प्रसिद्ध मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअॅपशी संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे. मेटा मालकीच्या WhatsApp ने भारतात ऑगस्टमध्ये 74 लाखांहून अधिक अकाऊंट बंदी घातल्याची माहिती समोर येत आहे.कंपनीने माहिती तंत्रज्ञान (IT) नियम 2021 नुसार प्रकाशित केलेल्या मासिक अहवालात ही माहिती दिली आहे. अहवालात 1 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट 2023 पर्यंतचा डेटा समाविष्ट आहे.
व्हॉट्सअॅपला ऑगस्टमध्ये 14,767 तक्रारी प्राप्त झाल्या आणि 71 वर कारवाई करण्यात आली. कंपनीच्या म्हणण्यानुसार, अहवालात युजर्सकडून प्राप्त झालेल्या तक्रारी आणि व्हॉट्सअॅपने केलेल्या कारवाईचा तपशील जाहीर केला आहे.
काय आहे नवीन आयटी नियम 2021?
दरम्यान, नवीन आयटी नियम 2021 अंतर्गत, 50 लाखांहून अधिक युजर्स आधार असलेल्या प्रत्येक सोशल मीडिया कंपनीने प्रत्येक महिन्याला तपशीलवार अहवाल शेअर केला पाहिजे, ज्यामध्ये युजर्सकडून आलेल्या तक्रारींवर काय कारवाई केली गेली, हे सार्वजनिकपणे सांगावे लागेल. भारतात व्हॉट्सअॅपचे सुमारे 50 कोटी युजर्स आहेत.