अहमदनगर : महानगरपालिकेत रोज कोणत्या न कोणत्या घोटाळ्याची माहिती उघडकीस येत आहे. याला आता जनता कंटाळली असून नगरकरांना आता स्वच्छ, प्रामाणिक समाजाचे काम करणारा सेवक हवा असून भारतीय जनता पार्टी नगरकरांच्या अपेक्षा पूर्ण करेल. श्वान निर्बीजीकरणापासून फेज टू च्या प्रश्नांवर आता पालिका प्रशासनाला जाब विचारला पाहिजे. या सर्वांची चौकशी होऊन दोषींवर कारवाई झाली पाहिजे. महापालिकेच्या गैरकारभारावर कोणीतरी आवाज उठविला पाहिजे तो आवाज भारतीय जनता पार्टी उठवेल. नगरच्या विकासासाठी आगामी काळात भाजप नगरकरांचा आवाज म्हणून काम करेल. देशात भाजपचे विकास पर्व सुरू असून ते अखंडपणे सुरु राहणार आहे, भ्रष्टाचारमुक्त महापालिकेसाठी भाजपा पर्याय असून भाजपचे नगरसेवक नगर शहराच्या विकासासाठी झटत आहे आगामी मनपा निवडणुकीत भाजपाची सत्ता आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी समाजात राहून काम करावे, नगरसेवक रामदास आंधळे हे उपनगरात समाज हितासाठी काम करत असून सर्वांना सोबत घेऊन विकासाचे प्रश्न मार्गी लावत असल्याचे प्रतिपादन भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष ॲड. अभय आगरकर यांनी केले.
पारिजात चौक ते टेलीफोन ऑफिस पर्यंत नगरसेवक रामदास आंधळे यांच्या प्रयत्नातून बसवण्यात आलेल्या पेव्हिंग ब्लॉक कामाचा लोकार्पण सोहळा भारतीय जनता पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष ॲड. अभय आगरकर यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी माजी महापौर बाबासाहेब वाकळे, महिला आघाडीचे अध्यक्ष प्रियाताई जानवे, भाजपचे सरचिटणीस सचिन पारखी, महेश नामदे, शहर चिटणीस छायाताई राजपूत, सावेडी मंडळ अध्यक्ष नितीन शेलार, उपाध्यक्ष अनिरुद्ध घैसास, माजी नगरसेवक बाळासाहेब गायकवाड, आकाश सोनवणे, राहुल आंधळे, गोकुळ काळे, शिरीष दानवे, अभिजीत दरेकर, बबन नांगरे, महेश कुलकर्णी, सचिन कजबे, अशोक गायकवाड, राजू मंगलारप, प्रसाद पाठक, आर. जी. सातपुते, कुमार नवले,राजेश सातपुते, प्रदीप घोडके, पुष्कर कुलकर्णी,अनुराग आगरकर, सचिन कुसळकर आदींसह परिसरातील नागरिक उपस्थित होते.
माजी महापौर बाबासाहेब वाकळे म्हणाले की, नगरसेवक रामदास आंधळे यांनी प्रभाग २,४,५,६ मध्ये विकासाची कामे मार्गी लावली आहे. त्यांच्या माध्यमांतून उपनगरात अनेक विकास कामे सुरूच राहणार असून त्यासाठी नगरसेवक रामदास आंधळे हे सक्षम नेतृत्व मिळाले आहे. नुकतेच त्यांची पक्षाच्या कोषाध्यक्ष पदी निवड झाली आहे. त्या माध्यमातून देखील आता पक्षाची ध्येय धोरणे सामान्य जनतेपर्यंत पोहचविण्याचे काम ते करतील असे ते म्हणाले.
नगरसेवक रामदास आंधळे म्हणाले की, सामाजिक काम करण्याची सुरुवातीपासून आवड असल्याने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली प्रभागात विकास कामे करण्याची संधी मिळाली. पुढे देखील सामाजिक कार्य असेच सुरु ठेवणार असून आता नगरसेवक पदासह पक्षाची मोठी जबाबदारी वरिष्ठांनी मला दिली आहे. त्या माध्यमातून देखील जनसेवेची संधी मिळाली असल्याने आनंद वाटतो. माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांनी प्रभागातील विकास कामाकरिता मोठा निधी उपलब्द करून दिला त्या माध्यमातून आज हि कामे पूर्ण होताना दिसत आहे. असे ते म्हणाले.
मी महापौर असल्यासारखेच वाटले – नगरसेवक रामदास आंधळे*
अहमदनगर महापालिकेत भाजपाची सत्ता असताना बाबासाहेब वाकळे हे महापौर होते त्या काळात त्यांनी शहर विकासाचे विविध प्रश्न त्यांनी मार्गी लावले, याचबरोबर सावेडी विकासासाठी जेव्हा जेव्हा निधीची मागणी केली तेव्हा तेव्हा माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांनी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिल्याने मला महापौर असल्यासारखे वाटले त्यामुळे मी सावेडी उपनगरात विकासाची कामे मार्गी लावू शकलो असे नगरसेवक रामदास आंधळे म्हणाले