Saturday, May 18, 2024

Video : महायुतीच्या भर सभेत पंतप्रधानपदासाठी राहुल गांधी यांचे नाव! भाजपा नेत्यांना हसू आवरेना

कोल्हापूरमध्ये शिवसेना शिंदे गटाकडून संजय मंडलिक यांना उमेदवारी मिळाली आहे. महायुतीचे उमेदवार म्हणून खुद्द पंतप्रधान मोदींची कोल्हापूरमध्ये सभा पार पडली. त्यानंतर पंतप्रधान मोदींच्याच नावाने जोरदार प्रचार सुरू आहे. महाविकास आघाडीकडून कोल्हापूरचे शाहू छत्रपती यांना उमेदवारी दिल्यामुळे “मान गादीला आणि मत मोदींना”, अशीही घोषणा कोल्हापूरमध्ये दिली गेली. त्यानंतर आता कागलच्या सभेचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे

कागल येथे संजय मंडलिक यांच्या प्रचारासाठी सोमवारी रात्री सभा पार पडली. यावेळी कॅबिनेट मंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, भाजपा नेते अखिलेशसिंह घाटगे आणि त्यांच्या बहीण शौमिका महाडिक उपस्थित होत्या. शौमिका यांनी भाषण करत असताना हा देश नरेंद्र मोदींच्या हातात देणार आहात की राहुल गांधी यांच्या हातात देणार आहात? असा प्रश्न उपस्थितांना विचारला. यावरून जनतेमधून कुणीतरी राहुल गांधी यांचे नाव घेतले.

भर सभेत पंतप्रधानपदासाठी राहुल गांधी यांचे नाव घेतल्यामुळे त्याक्षणी काय उत्तर द्यावे? याचे भान कुणालाच राहिले नाही.काही सेकंदाचे मौन बाळगल्यानंतर भाषण करणाऱ्या शौमिका महाडिक यांनाही हसू आवरेना झाले. तसेच मंचावर बसलेले हसन मुश्रीफही खळखळून हसताना दिसले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles