हॉटेलमध्ये जेवायला गेल्यावर खायला काय ऑर्डर द्यायची, हा प्रश्न नेहमीच सगळ्यांना पडतो आणि मग मित्र-मैत्रिणी, कुटुंबातील सदस्य यांच्यामध्ये चर्चा सुरू होते. या संवादादरम्यान काही जण ‘मला काहीही चालेल किंवा तू जे मागवशील, ते मी खाणार’ असे आपण सहज बोलून जातो. तर असे ऐकल्यावर अनेक जण यावर विनोद करतात आणि हॉटेलमध्ये किंवा मेनू कार्डमध्ये असा पदार्थ नाही मिळत, असे सांगतात. आज सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे; ज्यात एका महिलेने ‘काहीही’ शब्दाचा पदार्थ तिच्या नवऱ्यासाठी बनवला आहे, जे पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही.
रेखा आणि अक्षय, अशी या जोडप्यातील व्यक्तींची नावे आहेत. जेवणासाठी काय बनवायचं, असे रेखा तिच्या नवऱ्याला म्हणजे अक्षयला विचारते. त्यावर अक्षय ‘काहीही बनवं’ असे उत्तर देतो. सारखे सारखे हेच उत्तर ऐकून रेखाला एक मजेशीर कल्पना सुचते. ती तवा गॅसवर ठेवते आणि ‘काहीही’ अक्षर लिहिण्यासाठी बेसनच्या पिठाचा उपयोग करते. तव्यावर ‘कुछ भी’ असे हिंदी भाषेत एक एक अक्षर लिहिते. नंतर ताटामध्ये प्रत्येक अक्षर ओळीत लावून बाजूला टोमॅटो सॉसने सजावट करते आणि नवऱ्याला जाऊन देते. नवरा ‘काहीही’ बनवायला सांगतो म्हणून ती ‘कुछ भी’ हा शब्द तव्यावर तयार करून, नवऱ्याला जेवण म्हणून खायला देते. या महिलेची भन्नाट कल्पना…