Wild Life सध्या हत्ती आणि गेंड्याच्या लढाईचा व्हिडीओ समोर आलाय. तसं तर दोघंही प्राणी बलवान आहेत. मात्र या दोघांपैकी लढाईत कोण कोणावर भारी पडलं हे पाहुया. हा व्हिडीओ काहीच वेळात सोशल मीडियावर व्हायरल झाला.
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक गेंडा आपल्या मुलासह जंगलात फिरताना पाहायला मिळतोय. तेवढ्यात तिथे एक हत्ती येतो. दोन हत्ती जंगलात फिरत असतात. गेंडा आपल्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. यामुळे तो हत्तीसमोर येऊन उभा राहतो. हत्ती त्याच्यापेक्षा उंची आणि ताकदीने मोठा असूनही तो गेंड्याच्या भीतीने मागे हटताना दिसतो. दोघेही एकमेकांशी भिडतात. मात्र शेवटी हत्तीवर गेंडा भारी पडताना दिसत आहे.