महाविकास आघाडीच्या पराभवाचे कारण अतिआत्मविश्वास असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यांनी अमोल खताळ आणि राधाकृष्ण विखे पाटील यांना मंत्रीपदाची संधी मिळण्याबाबतही आपले विचार मांडले. त्यांनी विरोधकांवर निशाणा साधत काँग्रेस नेत्यांवरही टीका केली.
सुजय विखे पाटील यांना यावेळी अमोल खताळ यांना मंत्रीपदाची संधी मिळेल का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर सुजय विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. “संधी मिळण्याची अपेक्षा प्रत्येकाला आहे. अमोलला मिळाली तर त्यात दु:ख वाटायचं काही कारण नाही. त्याने त्याच्या मेहनतीने यश मिळवले आहे. संगमनेर तालुक्याचे प्रश्न सोडवण्यासाठी अमोल खताळांना संधी मिळाली तर तालुक्याला देखील आनंद होईल. पण हा निर्णय कोण्या एकट्याचा नाही, तीन नेते मिळून जो योग्य असेल तो निर्णय घेतील. आम्ही संधीची वाट बघत नाही, आम्ही कामाला सुरूवात केली आहे. विकासाला पुन्हा एकदा सुरूवात केली आहे”, असं सुजय विखे म्हणाले.
राधाकृष्ण विखे यांना मंत्रीपद मिळेल का? असा प्रश्न सुजय विखे यांना विचारला असता, “जे मिळालं त्याची कधी अपेक्षा केली नाही. जे मिळालं ते साईबाबांनी पदरात टाकलं आहे. साईंच्या आशीर्वादाने जनतेने आठव्यांदा विखे पाटील परिवाराला काम करण्याची संधी दिली. बाबा जे पदरात देतील ते आम्ही निस्वार्थपणे स्वीकारू, आम्हाला अपेक्षा नसते. निस्वार्थ भावनेने काम केल्यास आपोआप गोष्टी येतात, त्याच भावनेतून काम करतोय”, असं सुजय विखे पाटील म्हणाले.भाजप नेते सुजय विखे पाटील यांनी आज ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली