दोन भावा भावांची, जावा जावांची भांडणं तुम्ही एकलीच असतील. माझा नवरा तुझा नवरा अशी सवती सवतींचीही भांडण तुम्ही पाहिली असतील, मात्र सध्या समोर आलेलं प्रकरण पाहून तुम्ही डोक्यालाच हात लावाल. बिहारमधील नालंदा जिल्ह्यातून एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. धाकट्या दिरासोबत लग्न करण्यासाठी दोन जावांमध्ये बाचाबाची झाली. वाद इतका विकोपाला गेला,की दोघींनी एकमेकांना लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. याचा धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नालंदा जिल्ह्यातील हिसला मलामा गावात राहणाऱ्या हरेंद्र पासवान या तरुणाच्या मोठ्या भावाचे काही दिवसांपूर्वी आजारपणाने निधन झाले होते. त्यामुळे हरेंद्रने आपल्या वहिनीसोबत लग्नगाठ बांधून त्याच्या मुलांचा सांभाळ करावा, अशी इच्छा नातेवाईकांची होती. या लग्नासाठी हरेंद्र तयारही झाला. मात्र, त्याचवेळी त्याच्या दुसऱ्या भावाच्या बायकोने मलाच हरेंद्रसोबत लग्न करायचं आहे, असा हट्टा धरला. या महिलेचा हरेंद्रच्या संपत्तीवर डोळा होता असा आरोप करण्यात आला आहे.
बिहार के नालंदा में एक देवर से शादी करने के लिए दो भाभियां आपस में भिड़ गईं, हाई वोल्टेज ड्रामे के बीच जमकर चले लात-घूंसे।#Bihar #BiharCrime #bihar_police #Nalanda #Hilsa pic.twitter.com/URh5QGJLNO
— Yogesh Sahu (@ysaha951) October 20, 2023