तरडगव्हाण येथील विधवा महिला सिंधुबाई पवळ यांना 2009 साली घरकुल मंजूर झाले होते. ते बांधण्यासाठी वडिलांनी बक्षीसपत्र जागा दिली. मात्र, सेवानिवृत्त ग्रामसेवक विश्वनाथ दशरथ जगदाळे यांनी ती जागा बक्षीस पत्रावर खाडाखोड करत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नावे केली.
त्यानंतर गट विकास अधिकारी श्रीगोंदा यांच्याकडे पाठपुरावा केला. मात्र पवळ यांची कोणतीच दखल घेतली नाही. तरडगाव ग्रामपंचायतच्यावतीने संबंधित जागेवरील जिल्हा परिषदेचे नाव काढण्याचा ठराव गटविकास अधिकारी श्रीगोंदा यांना देण्यात आला आहे. याचबरोबर खा. निलेश लंके यांचे देखील पत्र देण्यात आले आहे. मात्र त्याला देखील केराची टोपली दाखवण्यात आली आहे. न्याय मिळत नसल्यामुळे विधवा महिला पवळ यांनी 2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंतीच्या दिवशी पंचायत समिती श्रीगोंदा येथे आत्मदहन करणार असल्याचा इशारा दिला आहे.