नवी दिल्ली : उत्तराखंडच्या नैनीतालच्या प्रसिद्ध नैनी तलावात एक महिला तलावात पडल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये नैनीताल तलावात बुडताना दिसत आहे. तलावात बुडणाऱ्या महिलेवर नावाड्याची नजर जाताच त्याने तिचा जीव वाचवला. महिलेचा जीव वाचवल्यानंतर नेटकऱ्यांनी नावाड्याचं कौतुक केलं आहे.
महिलेचा जीव वाचवल्यानंतर तिला बीडी पांडे रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. महिलेवर उपचार केल्यानंतर तिची प्रकृती तब्येत स्थिर आहे. महिलेच्या अनुसार, कौटुंबीक वादाला कंटाळून महिलेला आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. ही घटना पाषाण देवी मंदिराजवळ घडली.
नवऱ्यासोबत भांडण झाल्यानंतर महिलेने तलावात उडी मारली. तलावात उडी मारल्यानंतर महिला जोरजोरात ओरडू लागली. त्याचवेळी नावाड्याची महिलेवर नजर पडली. त्यानंतर नावाड्याने तातडीने महिलेजवळ त्याची होडी नेली. त्यानंतर महिलेचा हात पकडून होडीत बसवलं. नावाडाच्या चपळाईने महिलेचा जीव वाचला आहे. डॉक्टरांनी महिलेची प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलं आहे.
हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी कमेंट्स करून कौतुकाचा वर्षाव केला आहे. एका युजरने म्हटलं की, ‘आयुष्यातील कठिण परिस्थितीपासून कधीही पळू नये. आता महिलेला जीवनाचा अर्थ कळाला असेल. जोपर्यंत एखादी मोठी घटना घडत नाही, तोपर्यंत लोकांचं डोक ठिकाण्यावर येत नाही. पोलिसांना विनंती आहे की, तलावात उडी मारणाऱ्या महिलेच्या विरोधात कडक कारवाई करावी. व्यक्तीचा जीव किंमती असतो. कोणीही आत्महत्या करू नये’.