Wednesday, April 17, 2024

Video: चक्क दोऱ्याने पलटले ऑमलेट! महिलेची एक आगळीवेगळी ट्रिक

अंड्याचे ऑमलेट. काहीजण या ऑमलेटला अंड्याचा पोळा असेदेखील म्हणतात. एक-दोन अंडी, मीठ, तिखट किंवा मिरची आणि हळद घालून मस्त फेटून घेतलेले अंडे गरम तव्यावर टाकले, कि अक्षरशः ५ मिनिटात मसाला ऑमलेट खाण्यासाठी तयार होते.

मात्र असे करताना एक विशिष्ट त्रास अनेकांना होतो. तो म्हणजे, ऑमलेट तव्यावर पलटणे. आता ते आकाराला लहान असुदे किंवा मोठे, ऑमलेट तव्यावर पलटणे काहींना अजिबातच जमत नाही. बऱ्याचदा तव्यावर पसरवले अंड्याचे मिश्रण पलटण्यावेळी मध्येच तुटते आणि मग सगळी मेहेनत वाया गेल्यासारखे वाटते. असे तुमच्याबरोबरही झाले आहे का?
सुरवातीला व्हिडीओमधील महिलेने, एका तव्यावर दोन दोरे अधिक चिन्हाप्रमाणे ठेवले. त्यावर नेहमीप्रमाणे अंड्याचे मिश्रण पसरवतो, तसे पसरले. ऑमलेट अर्धवट शिजल्यानंतर, तिने तव्यावर ठेवलेल्या दोऱ्याच्या सर्व बाजू हातात घेऊन, दोऱ्याच्या मदतीने ते ऑमलेट तव्यावर पलटले. शेवटी ऑमलेट दोन्ही बाजूंनी पूर्ण शिजल्यानंतर त्यामध्ये अडकलेल्या दोऱ्यांना बाहेर काढून घेतले असल्याचे आपण या व्हिडीओमध्ये पाहू शकतो.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles