फेमस आणि व्हायरल होण्यासाठी आजकाल कोण काय करेल याचा काही नेम नाही. प्रसिध्दीसाठी व्यक्ती जीव धोक्यात घालून स्टंट करतात. सध्या रील व्हिडीओची फार मोठी क्रेझ आहे. रील व्हिडिओमध्ये काहीतरी हटके आणि अतरंगी करावं यासाठी प्रत्येक व्यक्ती काही ना काही करामती करताना दिसते.अशात एका महिलेने तर वेडेपणाची हद्दच पार केली आहे.
या महिलेने एका सिलिंडरच्या टाकीवर उभे राहून डान्स केला आहे. तिचा डान्स पाहून सगळेच थक्क झालेत. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, महिला आपल्या घरामध्ये अंगणात सिलिंडरची टाकी घेऊन आली आहे. तिने लाल आणि पिवळ्या रंगाची साडी परिधान केली आहे.ही महिला एखाद्या संस्कारी मुलीप्रमाणे डोक्यावर पदर घेऊन उभी आहे. आता रील व्हिडिओ बनवण्यासाठी या महिलेने चक्क सिलिंडरवर उभे राहण्याची डेरींग केली आहे. ती सिलिंडरच्या टाकीवर फक्त उभी नाही तर डान्स सुद्धा करत आहे. तिच्या डान्सचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.