Saturday, October 5, 2024

डॉक्टर महिलेची ६ महिन्याच्या बाळासह गोदावरी नदीत उडी; मन सुन्न करणारी घटना

महिला डॉक्टरने 6 महिन्यांच्या बाळासह गोदावरी नदीत उडी मारल्याची धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये घडली. छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमध्ये घडलेल्या या मन सुन्न करणाऱ्या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेची माहिती मिळताच बचाव पथकांनी शोध मोहिम राबवली. 2 तासाच्या रेस्क्यू ऑपरेशननंतर महिलेचा मृतदेह सापडला असून 6 महिन्याच्या चिमुकल्याचा अद्यापही शोध लागला नाही.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, महिला डॉक्टरने 6 महिन्यांच्या बाळासह गोदावरी नदीत उडी मारल्याची धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये घडली. पूजा प्रभाकर व्हरकटे असे या आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरचे नाव आहे. नदीपात्रात महिलेचा मृतदेह सापडला असून ६ महिन्याच्या बाळाचा शोध अद्याप लागलेला नाही. आईने चिमुकल्या बाळासोबत नदीत उडी घेऊन आयुष्य संपवल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

ऑटो रिक्षात बसून पैठण शहरातून एका खेड्या गावात जायचे आहे, असं सांगून डॉक्टर पूजा प्रभाकर व्हरकटे या आपल्या बाळासोबत रिक्षामध्ये बसल्या होत्या. पूल आल्यानंतर रिक्षा चालकाला “मला गोदावरी नदीचे पाणी पाहायचे आहे” असे म्हणत रिक्षा थांबवली आणि काही क्षणातच आपल्या चिमुकल्या बाळासह गोदावरी नदी पात्रात पुलावरून उडी घेतली.

याबाबत रिक्षा चालकाने तात्काळ बचाव पथक तसेच पोलिसांना माहिती दिली. 2 तासाच्या रेस्क्यू ऑपरेशननंतर 15 ते 20 मच्छीमारांच्या मदतीने या महिलेचा मृतदेह सापडला परंतु चिमुकल्या बाळाचा मात्र शोध लागला नाही. दरम्यान, उच्चशिक्षित डॉक्टर महिलेने आपल्या पोटच्या मुलाला घेऊन इतका टोकाचा निर्णय का घेतला? याबाबतचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles