शेवगाव शहरात पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर झाली आहे. बारा ते पंधरा दिवसांनी पाणीपुरवठा होत असल्याने पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे पाण्याच्या टाकीवर जाऊन शोलेस्टाईल करत निषेध आंदोलन केले
शहरात अनेक वर्षांपासून कधी बारा तर, कधी पंधरा दिवसांनी पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे महिलांना पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे. सध्याची पाण्याची पाईपलाईन अतिशय जीर्ण झाली आहे. अनेकदा गटारीचे
पाणी पाईपलाईनमध्ये उतरून हेच
पाणी पिण्यास येत असल्याने साथीच्या आजारांचा धोका वाढत आहे. यासाठी नगरपरिषदेच्या स्तरावरून योग्य ती सुधारणा व्हावी, शहरात दिवसाआड पाणीपुरवठा व्हावा व शेवगावकरांना पिण्याच्या पाण्याच्या टंचाई बाबत दिलासा मिळावा. या मागणीसाठी शेवगाव शहरातील महिलांनी आक्रमक होत पाण्याच्या टाकीवर चढत आंदोलन केले यावेळी शहरातील महिला मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते