: रोजच्या जीवनात आपल्याकडून प्लास्टिकचा वापर हा होतोचं. त्यात प्लास्टिकच्या बाटलीचाही समावेश होतो.घरात पाहुणे येणार असतील किंवा एखाद थंडगार पेय पिण्याची इच्छा झाली तर आपण दुकानातून कोल्ड्रिंकची बाटली आणतो. कोल्ड्रिंक्स प्यायल्यानंतर आपण प्लास्टिकची बाटली फेकून देतो. पण बरेचजण या प्लास्टिकच्या बाटल्यांचा उपयोग विविध गोष्टी बनवण्यासाठी करतात. पण तुम्ही कधी प्लास्टिकच्या बाटलीच्या झाकणाचा पुन्हा वापर केलेला पहिला आहे का ? तर आज सोशल मिडियावरील एका व्हायरल व्हिडीओत प्लास्टिकच्या बाटलीच्या झाकणाचा उपयोग ब्रश होल्डर म्हणून करण्यात आला आहे.
सुरुवातीला काही प्लास्टिकच्या बाटल्यांचे झाकण काढून बाजूला ठेवले आहेत. त्यानंतर सगळ्यात आधी एक झाकण घाली ठेवून त्याच्यावर एक पांढरा दांडा ठेवण्यात आला आहे आणि त्यावर सुद्धा एक झाकण लावलं आहे आणि बेस तयार करून घेतला आहे. त्यानंतर उरलेल्या प्लॅस्टिकच्या झाकणांचा आतील भाग काढून टाकून त्यांना मधोमध लावण्यात आलेल्या पांढऱ्या दांड्यासोबत चिटकवून घेण्यात आले आहे. आणि त्यात ब्रश ठेवून दिले आहेत. आणि अशा प्रकारे झाकणांपासून उपयोगी असे ब्रश होल्डर बनवण्यात आले आहे.