Video: कहरच! विजेच्या खांबावर चढून तरुणीचा डान्स; रीलसाठी जीव टाकला धोक्यात

0
54

: सोशल मीडियावर सध्या एका महिलेचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात महिलेने रिल्सवर प्रसिद्ध होण्यासाठी चक्क विजेच्या खांबावर चढून डान्स केलेला आहे. व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांमध्ये चर्चेचा विषय ठरत असून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केलेला आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला मोकळ्या मैदानात एक विजेचा खांब दिसत आहे. जर तुम्ही त्या खांबावर पाहिले असता एक महिला त्यावर चढली आहे. महिलेने फक्त त्यावर थांबलेली नाही तर त्यावर चढून डान्स करत आहे आणि व्हिडिओ तिथे असलेला एक व्यक्ती मोबाईलमध्ये शूट करत आहे. हा रिल व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

धक्कादायक व्हिडिओ इन्स्टाग्रामवरील ”maheshpatel8819” या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला शिवाय व्हिडिओला लाखोंच्या संख्येने व्ह्यूज मिळाले असून अनेक लाईक्स नेटकऱ्यांनी या व्हिडिओला केल्या आहेत.

एवढेच नाही तर व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक कमेंटस आलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,”शॉक लागला असता तर” तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,”बापरे किती ती हिंमत”,अशा अनेक हैराणजनक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.