बहुप्रतिक्षित महिला आरक्षण विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे लोकसभेत हे विधेयक बुधवारी मांडलं जाण्याची शक्यता आहे. गेल्या 27 वर्षांपासून हे विधेयक रखडलं होतं. आता मोदी सरकारच्या माध्यमातून हे विधेयक पास होईल असंच चित्र आहे. त्यामुळे मोदी सरकारच्या काळात आणखी एक ऐतिहासिक निर्णय झाल्याची नोंद होईल. महिला आरक्षण विधेयकामुळे लोकसभा आणि राज्य विधानसभेत महिलांना 33 टक्के आरक्षण मिळणार आहे. आरक्षण जाहीर झाल्यानंतर निवडणुकीसाठी आरक्षित जागा रोटेशन पद्धतीने बदलली जाईल.
लोकसभा, विधानसभेत महिलांना ३३ टक्के आरक्षण, विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी…
- Advertisement -