नवी दिल्ली : आयसीसी वुमेन्स टी२० वर्ल्ड कपचं सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. वुमेन्स टी२० वर्ल्ड कप स्पर्धा बांगलादेशात होणार होती. मात्र, तेथील परिस्थितीमुळे या स्पर्धेचं आयोजन दुबईत करण्यात आलं आहे. शारजाह क्रिकेट स्टेडियम आणि दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये हे सामने खेळले जाणार आहेत. या स्पर्धेची सुरुवात ३ ऑक्टोबर रोजी होणार आहे. या स्पर्धेत बांगलादेश आणि स्कॉटलँडमध्ये पहिला सामना होणार आहे.
भारतीय महिला संघाचा पहिला सामना ४ ऑक्टोबर रोजी न्यूझीलंड विरोधात होणार आहे. भारत आणि पाकिस्तानमधील सामना हा ६ ऑक्टोबर रोजी होणार आहे. यंदा आयसीसी टी२० विश्वचषक स्पर्धेत एकूण २३ सामने होणार आहेत. ही स्पर्धा ३ ऑक्टोबर ते २० ऑक्टोबरपर्यंत सुरु राहणार आहे. यंदा सेमीफायनल आणि फायनलसाठी रिझर्व्ह डे ठेवण्यात आला आहे.
https://x.com/ICC/status/1835961369985700230?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1835961369985700230%7Ctwgr%5E776cc5f4d10aa160cb761e302a55837b0cf93702%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fsaamtv.esakal.com%2Fsports%2Fwomen-t20-world-cup-2024-announced-know-about-india-vs-pakistan-match-schedule-vvg94
टी२० वर्ल्डकपचं वेळापत्रक अचानक बदललं, आता IND W Vs PAK W कधी भिडणार? जाणून घ्या
- Advertisement -